शिरसमणीत तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:01 IST2019-05-16T23:00:53+5:302019-05-16T23:01:09+5:30
कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.

शिरसमणीत तीव्र पाणीटंचाई
कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.
शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्याचे पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरून घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्रम पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले. गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली; मात्र ती अपयशी ठरली. गावात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे, त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते. त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितले.
पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रुपये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले; मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते, वैशाली शिरसाठ, जिजाबाई पाटोळे, मंगलाबाई पाटोळे, सोनाली मोहिते, सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे . जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणीगेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून धावणाºया एका वाहनाने पाणी घेऊन जाणाºया आदिवासी महिलेला व मुलाला धडक मारल्याने दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसमणी हे ओतूर खोºयातील महत्त्वपूर्ण गाव आहे. ओतूर धरणाच्या गळतीचा प्रश्न कायमचा सुटल्यास शिरसमणी गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. धरणात पाणी असल्यास या परिसरात मुबलक पाणी असते; मात्र गळतीतून जानेवारी अखेर सर्व पाणी वाहून गेल्यावर या भागातील नरूळ, मेहदर, ओतूर, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, जिरवाडे, कळवण खुर्द आदी गावांना पाच महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सुनील वाघ यांची
दि. २४ मार्चपासून विहीर अधिग्रहित केली आहे. त्या विहिरीवरून शिरसमणी गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित बैठक किंवा कामकाजानिमित्ताने जावे लागते, त्यामुळे त्या दिवशी
ग्रामपंचायतीमध्ये जात नाही. अन्य दिवशी मी नियमित शिरसमणी ग्रामपंचायत कार्यालयात जाते.
- ए. पी. गोराणे
ग्रामसेविका, शिरसमणीपाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. ग्रामपंचायतीने लाखो रु पये खर्च करून नवीन विहीर खोदली आहे; परंतु पाणी लागले नाही. ग्रामसेवक आठवड्यातून एखाद्याच दिवशी चमकत असल्याने उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत तक्र ार कोणाकडे करायची ? हा मोठा प्रश्न आहे.
- नामदेव शिरसाठ,
शिरसमणी