पेलिकन पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी एकनिष्ठ फ ाउंडेशनचा पुढाकार

By Admin | Updated: May 15, 2014 23:53 IST2014-05-15T23:45:51+5:302014-05-15T23:53:30+5:30

नाशिक : सिडको येथील पेलिकन पार्कमध्ये होणारी वृक्षांची तोड रोखण्यासाठी येथील एकनिष्ठ युवा फ ाउंडेशनने पुढाकार घेतला असून, वृक्षांच्या मोजणीस प्रारंभ करण्यात आला आहे़

Integrated Foundation's initiative to save the trees in Pelicans Park | पेलिकन पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी एकनिष्ठ फ ाउंडेशनचा पुढाकार

पेलिकन पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी एकनिष्ठ फ ाउंडेशनचा पुढाकार

नाशिक : सिडको येथील पेलिकन पार्कमध्ये होणारी वृक्षांची तोड रोखण्यासाठी येथील एकनिष्ठ युवा फ ाउंडेशनने पुढाकार घेतला असून, वृक्षांच्या मोजणीस प्रारंभ करण्यात आला आहे़
पेलिकन पार्क येथे लाकडे तसेच जळणासाठी गुपचूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. ही वृक्षतोड होऊ नये म्हणून एकनिष्ठ युवा फाउंडेशनच्या वतीने येथील वृक्षांची मोजणी करून त्यांना क्रमांक देण्यात येत आहेत़ यामुळे वृक्षतोडीवर लक्ष ठेवणे शक्य होणार असून, ही झाडे वाचविण्यासाठी फ ाउंडेशनचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत़ तसेच परिसरातील नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे़ पहाटे तसेच सायंकाळी फिरण्यासाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले असून, वृक्ष तोडताना कोणी आढळल्यास त्यांनी तत्काळ फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ यावेळी एकनिष्ठ युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश गांगुर्डे, उपाध्यक्ष अमोल कदम, गिरीश पगारे, सुजित देशमुख, संदीप दुधाने, कल्पेश देवरगावकर, हरीश शेवाळे, योगेश आहिरे, अमोल धोंडगे, सचिन गांगुर्डे, यश खैरनार, हर्षल मराठे, मयूर पाटील, अक्षय पांचाळ, अजय कोळी, प्रवीण घुमरे, निखिल भवर, मनोज सावंत आदि उपस्थित होते़
फ ोटो क्रमांक - 15पीएचएमए83
फ ोटोओळी -

Web Title: Integrated Foundation's initiative to save the trees in Pelicans Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.