कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना २५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:39 PM2020-04-01T17:39:39+5:302020-04-01T17:42:47+5:30

नाशिक : सध्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाºया नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना एक हजार रु पये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचा-यांसाठी काढलेल्या ५० लाख रु पयांच्या विम्याच्या धर्तीवर या कर्मचाºयांसाठी ९० दिवसांसाठी २५ लाख रु पयांचा विमा उतरविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक बुधवारी निर्गमित करण्यात आले असून, सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Insurance protection up to Rs 1 lakh for employees who fight against Corona | कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना २५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना २५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण

Next
ठळक मुद्देजोखमीच्या कामाची दखलप्रोत्साहनासाठी निधीही मिळणार

नाशिक : सध्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाºया नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना एक हजार रु पये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचा-यांसाठी काढलेल्या ५० लाख रु पयांच्या विम्याच्या धर्तीवर या कर्मचाºयांसाठी ९० दिवसांसाठी २५ लाख रु पयांचा विमा उतरविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक बुधवारी निर्गमित करण्यात आले असून, सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण पातळीवर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेऊन जिवाची पर्वा न करता करण्यात येत आहेत. हे कर्मचारी आपल्या जिवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाºया नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रु पये इतकी प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये या विषाणूंच्या विरोधात लढा देणा-या सर्व आरोग्य कर्मचा-यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत न्यू इंडिया इश्यूरन्स कंपनीमार्फत ९० दिवसांसाठी ५० लाख रु पयांचा विमा उतरविला आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती या कर्मचा-यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रु पयांचा विमा उतरविण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून भागविण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयातून राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना विषाणूंच्या विरोधात लढा देणा-या २ लाख ७३ हजार कर्मचाºयांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असून, या कर्मचा-यांनाही विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे.

Web Title: Insurance protection up to Rs 1 lakh for employees who fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.