शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:48+5:302021-09-06T04:18:48+5:30

कालवा फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेऊन शासन निर्देशानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार ...

Instructions for reporting losses to farmers | शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल देण्याची सूचना

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल देण्याची सूचना

कालवा फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेऊन शासन निर्देशानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार पवार यांनी यावेळी दिली. चणकापूर उजवा कालव्यावर नियंत्रण असणारे गिरणा नदी खोरे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून देत भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली. कालवा फुटला त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा,पूरपाणी बंद झाल्यानंतर कालव्याची दुरुस्ती करण्याचेही पवार यांनी सांगितले. कालव्याजवळील नाले बुजल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. बुजलेले नाले पुन्हा प्रवाहित करुन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी राजेंद्र शिंदे, रामकृष्ण पगार, रामदास पगार, नंदकुमार पगार, उमेश पगार ,भावराव पगार ,संतोष पगार, सागर शिंदे ,रोशन पगार ,पंकज शिंदे, जितेंद्र शिंदे ,नितीन शिंदे, गोकुळ शेवाळे ,ललित शिंदे, भाऊसाहेब आहेर,प्रवीण आहेर, सचिन रौंदळ नीरज पगार, पवन पगार,गोपाळ शिंदे, दत्तू पगार, अशोक शिंदे, जयेश शिंदे, गौरव शिंदे, महादू आहेर, सुरेश शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.

इन्फो

शेतीपिकांचे मोठे नुकसान

नवीबेज शिवारात ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चणकापूर उजव्या कालव्याच्या आतील बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणाच्या आतील भागाला मोठे भगदाड पडल्याने परिसरातील ४० ते ५० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. रात्री अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. या पाण्यामुळे पाटाखालच्या शेतातील उभी पिके, अति पाण्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या कांदाचाळीत व घरात पाणी शिरले होते. शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कोबी, सोयाबीन, तुवर , द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे.

फोटो - ०५ कळवण कालवा

नवीबेज शिवारातील चणकापूर कालवा फुटल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आमदार नितीन पवारांनी भेट घेऊन चर्चा केली. त्याप्रसंगी उपस्थित बाजार समिती सभापती धनंजय पवार, उपअभियंता विजय टिळे, राजेंद्र शिंदे, रामकृष्ण पगार, रामदास पगार, नंदकुमार पगार, उमेश पगार,भावराव पगार आदी.

050921\05nsk_37_05092021_13.jpg

फोटो - ०५ कळवण कालवा 

Web Title: Instructions for reporting losses to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.