‘त्या’ कांदा व्यापायावर कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:07 AM2018-02-24T00:07:01+5:302018-02-24T00:07:57+5:30

कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडर्स कंपनीच्या कांदा व्यापाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने येथील बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत.

 Instructions on 'that' onion business | ‘त्या’ कांदा व्यापायावर कारवाईचे निर्देश

‘त्या’ कांदा व्यापायावर कारवाईचे निर्देश

Next
ठळक मुद्दे कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळथकीत रकमेपोटी ३० लाख रुपयांचे वाटप केले शेतकºयांनी संयम ठेवून बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे,

मालेगाव : कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडर्स कंपनीच्या कांदा व्यापाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने येथील बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत.  बाजार समिती प्रशासनाने गेल्या दोन दिवसात थकीत रकमेपोटी ३० लाख रुपयांचे वाटप केले आहे. मात्र याप्रश्नी शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाजार समिती प्रशासनाची या प्रकारामुळे चांगलीच धावपळ उडाली आहे.
मुंगसे कांदा खरेदीवरील जय भोले ट्रेडर्स कंपनीचे शिवाजी सूर्यवंशी यांनी शेतकºयांचा कांदा खरेदी केला. मात्र त्यापोटी दिलेले धनादेश बॅँकेत वटले नाहीत. यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी आंदोलनदेखील करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने नियोजन केले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात एक कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. गुरुवारी सायंकाळ-पर्यंत २२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. शुक्रवारी उर्वरित आठ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत.  डिसेंबर महिन्यात ज्या शेतकºयांनी कांदा विकला आहे अशा शेतकºयांना पैसे अदा केले जाणार आहेत. शेतकºयांना पैशांचे वाटप केले जाणार आहे. संबंधित शेतकºयांनी संयम ठेवून बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, बंडू बच्छाव, सचिव अशोक देसले आदींनी केले आहे.  पैसे अदा न केल्यास मालमत्ता जप्तीचे आदेश  शेतकºयांना वेठीस धरणाºया व्यापाºयावर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहेत. संबंधित व्यापाºयाने वेळेत पैसे अदा न केल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
४शेतमाल विक्री करणाºया शेतकºयास त्याच दिवसाचा धनादेश देणे गरजेचे असताना व्यापारी सूर्यवंशी यांनी पुढील एक महिन्याचा धनादेश दिले आहेत. दिलेले धनादेशही वटत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
व्यापारी सूर्यवंशी यांनी नाशिक व बांगलादेश येथील व्यापाºयाला कांदा विकला  आहे. संबंधित कांदा खरेदीदार व्यापाºयाकडे बाजार समितीचे कर्मचारी व सूर्यवंशी यांचा प्रतिनिधी जाऊन पैसे आणण्याचे नियोजन करण्यात आले
आहे.

Web Title:  Instructions on 'that' onion business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा