शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सिंचन योजनांचा समावेश करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:24 PM

अरबी समुद्रात वाहून जाणारे नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यासाठी नार-पार नद्याजोड प्रकल्प योजना करण्यापूर्वी कळवण व सुरगाणा तालुक्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनांचा समावेश करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाला दिले.

ठळक मुद्देबैठक : नार-पार प्रकल्प

कळवण :कळवण, सुरगाणा तालुक्यातील प्रस्तावित सिंचन योजनांसह ओतूर, दुमी, जामशेत, अपर पुनंद प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार नितीन पवार यांना बैठकीत दिले. दुष्काळी भागातील नागरिकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्रालाच मिळावे अशी भूमिका पाटील व भुजबळ यांनी घेतली. त्यावेळी पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासनस्तरावर प्रस्तावित व पाणी उपलब्ध प्रमाणपत्र असलेल्या स्थानिक सिंचन योजना व प्रकल्पांचाही नार-पार योजनेत समावेश करून सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देत गती देण्याचे काम करावे, अशी मागणी बैठकीतकेली.जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या पुढील बैठकीत मृद व जलसंधारण विभागाकडील सुरगाणा तालुक्यातील जलसंपदा विभागाकडून हस्तांतरित केलेल्या संतखांब, वांगण, सोनगीर, मालगोंदा, बाळओझर, उंबरविहीर, सालभोये, हनुमंतमाळ, सुभाषनगर, रंगतविहीर, पळसण आदी ३१ प्रस्तावित लघुपाटबंधारे योजनांसह ४३ कोल्हापूर टाइप बंधारे, साठवण बंधारे, रोहयो अंतर्गत अपूर्ण असलेले १७ पाझर तलाव, नऊ नादुरु स्त कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ५३ नादुरु स्त पाझर तलाव व गाव तलाव आदी योजनांच्या कामांचा आढावा सर्व सिंचन योजना पूर्ण करण्याचे आश्वासन पाटील यांनी बैठकीत दिले.

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी