सिंचन योजनांचा समावेश करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:15 IST2020-01-29T22:24:35+5:302020-01-30T00:15:09+5:30

अरबी समुद्रात वाहून जाणारे नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यासाठी नार-पार नद्याजोड प्रकल्प योजना करण्यापूर्वी कळवण व सुरगाणा तालुक्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनांचा समावेश करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाला दिले.

Instructions for inclusion of irrigation schemes | सिंचन योजनांचा समावेश करण्याचे निर्देश

सिंचन योजनांचा समावेश करण्याचे निर्देश

ठळक मुद्देबैठक : नार-पार प्रकल्प

कळवण :
कळवण, सुरगाणा तालुक्यातील प्रस्तावित सिंचन योजनांसह ओतूर, दुमी, जामशेत, अपर पुनंद प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार नितीन पवार यांना बैठकीत दिले. दुष्काळी भागातील नागरिकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्रालाच मिळावे अशी भूमिका पाटील व भुजबळ यांनी घेतली. त्यावेळी पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासनस्तरावर प्रस्तावित व पाणी उपलब्ध प्रमाणपत्र असलेल्या स्थानिक सिंचन योजना व प्रकल्पांचाही नार-पार योजनेत समावेश करून सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देत गती देण्याचे काम करावे, अशी मागणी बैठकीत
केली.
जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या पुढील बैठकीत मृद व जलसंधारण विभागाकडील सुरगाणा तालुक्यातील जलसंपदा विभागाकडून हस्तांतरित केलेल्या संतखांब, वांगण, सोनगीर, मालगोंदा, बाळओझर, उंबरविहीर, सालभोये, हनुमंतमाळ, सुभाषनगर, रंगतविहीर, पळसण आदी ३१ प्रस्तावित लघुपाटबंधारे योजनांसह ४३ कोल्हापूर टाइप बंधारे, साठवण बंधारे, रोहयो अंतर्गत अपूर्ण असलेले १७ पाझर तलाव, नऊ नादुरु स्त कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ५३ नादुरु स्त पाझर तलाव व गाव तलाव आदी योजनांच्या कामांचा आढावा सर्व सिंचन योजना पूर्ण करण्याचे आश्वासन पाटील यांनी बैठकीत दिले.

Web Title: Instructions for inclusion of irrigation schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.