शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन महिन्यात वाटर मीटर बसवा; जलसंपदा मंत्र्यांचे महापालिकेला आदेश

By suyog.joshi | Updated: February 15, 2025 15:04 IST

बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात असमतोल पाणी वाटप होत आहे. मलनिसारण केंद्रातून नदीपात्रात ६५ टक्के पाणी प्रक्रिया करून सोडणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ते होत नसल्याचा ठपका ठेवत सध्या पाणी गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. सर्व भागात सारखे पाणीवाटप होणे गरजेचे असून त्यासाठी येत्या तीन महिन्यात शहराच्या प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवून शासनाला अहवाल सादर करावा असे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दिले. बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विखे म्हणाले, - पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वच महापालिका, नगर पालिकेसाठी आढावा बैठक घेण्याचे काम सुरू आहे. बिगर सिंचनाचे आरक्षण वाढत चालले आहे. नाशिक महापालिकेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्याचीही माहिती घेतली जात आहे. नाशिकचे पाणी मराठवाड्याला पळविले जात असल्याबद्दल विखे म्हणाले, याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही चर्चा नाही.उलट दिलेले पाणी मनपाने वापरावे. त्यातील ६५ टक्के पाणी नदीत आम्हाला द्यावे. मंजूर पाण्याची कपात केली जाणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छ हवी

आगामी कुंभमेळ्याच्या पाश्व'भूमीवर गोदावरी स्वच्छ ठेवणे, प्रदुषणमुक्त करणे गरजेचे आहे. त्यात प्रत्येकाचाच सहभाग महत्वाचा आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाकडे जास्तीत जास्त निधी मागावा, त्याच निधीतून पाण्यासाठी अधिक निधी कसा वापरता येईल याचे नियोजन पाटबंधारे खाते व महापालिकेने एकत्रितरित्या करावे असे आवाहनही विखे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील