सरकारवाड्याची आयुक्तांकडून पाहणी

By Admin | Updated: June 6, 2016 00:26 IST2016-06-05T22:08:11+5:302016-06-06T00:26:00+5:30

उपाययोजना : पुरातत्व विभागाकडून महापालिकेचला अनेक सूचना; मंदिरांची होणार डागडुजी

Inspector of the Sarkarwada Commissioner | सरकारवाड्याची आयुक्तांकडून पाहणी

सरकारवाड्याची आयुक्तांकडून पाहणी

 नाशिक : महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शनिवारी पेशवेकालीन सरकारवाडा आणि ऐतिहासिक सुंदरनारायण मंदिराची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला काही सूचना केल्या.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी सरकारवाड्याला भेट देऊन पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पुरातत्व खात्याने सरकारवाड्यासमोरील धोकादायक विद्युत खांब हटविण्याची सूचना केली. तसेच एक झाडही धोकादायक स्थितीत असल्याने ते काढण्याची मागणी केली.
सुंदरनारायण मंदिराच्या कळसावर १८४८ मध्ये वीज कोसळली होती. त्यात कळसाचे नुकसान झाले होते. सदर कळसाची पुनर्बांधणी करायची असल्याने महापालिकेने कामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि होळकर पुलामागे पायऱ्या बनवाव्यात, अशी मागणीही पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली. यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी शहर अभियंता सुनील खुने तसेच पुरातत्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Inspector of the Sarkarwada Commissioner