‘त्या’ कामाची पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 19:22 IST2018-08-24T19:22:07+5:302018-08-24T19:22:21+5:30
सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील देवनदीवरील बंधाºयाला पडलेल्या भगदाडाची व हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याच्या कामाची पंचायत समितीच्या भाजपाच्या पदाधिकाºयांनी पाहणी करुन संबंधित ठेकेदार व अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली.

‘त्या’ कामाची पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील देवनदीवरील बंधाºयाला पडलेल्या भगदाडाची व हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याच्या कामाची पंचायत समितीच्या भाजपाच्या पदाधिकाºयांनी पाहणी करुन संबंधित ठेकेदार व अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली.
गेल्या रविवारी सोनांबे येथील देवनदीच्या पुलावर असलेल्या खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागली होती. त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. यानंतर पंचायत समितीचे भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार व बाबासाहेब कांदळकर यांनी सोनांबे येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी करीत चौकशीची मागणी केली.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत देवनदीवर सदर बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले होते. गेल्या रविवारी देवनदी दुथडी भरुन वाहात असतांना बंधाºयाला भगदाड पडून लाखों लिटर पाणी नदीतून वाहून जात आहे. त्यामुळे झालेल्या या कामाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयात दिले होते.
त्याचबरोबर हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपूर्वी झाले आहे. तीन महिन्यातच सदर रस्ता खचत चालला असून डांबर निघून जात असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. या कामाचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या कामाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे गडाख व पगार यांनी सांगितले.