नांदूरशिंगोटे चेकपोस्टवर वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST2021-04-27T04:15:39+5:302021-04-27T04:15:39+5:30

पोलीस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हद्दीवर चेक ...

Inspection of vehicles at Nandurshingote check post | नांदूरशिंगोटे चेकपोस्टवर वाहनांची तपासणी

नांदूरशिंगोटे चेकपोस्टवर वाहनांची तपासणी

पोलीस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हद्दीवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने जिल्हा बंदीचे आदेश जाहीर केले आहे. नांदूर शिंगोटे येथील चेकपोस्टवर वावी पोलीस ठाण्याकडून चोवीस तास सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात किंवा परजिल्ह्यात प्रवेश करताना ई पासची तपासणी केली जात आहे. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे, ठाणे अंमलदार एन. एस. आडके आदींसह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

फोटो - २६ नांदूरशिंगोटे पोलिस

नांदूरशिंगोटे येथील नाशिक - पुणे महामार्गावर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Inspection of vehicles at Nandurshingote check post