खेडगावच्या पेयजल योजनेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 16:22 IST2021-07-08T16:21:07+5:302021-07-08T16:22:03+5:30
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना इनटेक वेल, इनटेक चेंबर, जॅकवेल खोलीकरण कामाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पाहणी करत उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

खेडगाव येथे कामाची पाहणी करताना रवींद्र शिंदे, भास्कर भगरे, दत्तात्रय पाटील, सोमनाथ ढोकरे आदी.
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना इनटेक वेल, इनटेक चेंबर, जॅकवेल खोलीकरण कामाची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पाहणी करत उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
रोहयो अंतर्गत केलेली फळबाग, आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी करुन काम पूर्ण करणेबाबत ठेकेदार यांना सूचना दिल्या. पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम पाहणी करुन वॉल कंपाउंड बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक पाठविणेबरोबरच ग्रामपंचायत खेडगाव गांडूळखत प्रकल्प, ग्रामपंचायत विकास कामे स्थिरीकरण तळे, सांडपाणी व्यवस्थापन व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कामाची पाहणी केली.
ढकांबे येथे पेव्हर ब्लॉक, हायमास्ट कामे, जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी व अनुषंगिक कामे, प्राथमिक शाळा येथे भेट देऊन शालेय पोषण आहार वाटप बाबतीत माहिती घेऊन सूचना दिल्या. ग्रामपंचायत दप्तर पाहणी केली.
तळेगाव दिंडोरी आरोग्य केंद्र दुरुस्ती काम पाहणी केली. यावेळी खेडगाव जि. प. सदस्य भगरे, सरपंच दत्तात्रय पाटील, सदस्य व ग्रामस्थ हजर होते.