हिरे यांच्याकडून खतप्रकल्पाची पाहणी
By Admin | Updated: January 19, 2015 00:26 IST2015-01-18T23:40:12+5:302015-01-19T00:26:18+5:30
हिरे यांच्याकडून खतप्रकल्पाची पाहणी

हिरे यांच्याकडून खतप्रकल्पाची पाहणी
नाशिक : खतप्रकल्पाचा बनलेला कचराडेपो आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी खतप्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आणि महापालिकेने त्यासंबंधी तातडीने पावले न उचलल्यास शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या खतप्रकल्पाची दुरवस्था झाली असून, खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याने कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, खतप्रकल्पावरील कचऱ्यातील प्रदूषित पाण्याचा निचरा होऊन ते आसपासच्या विहिरींमध्ये उतरत आहे. खतप्रकल्पाबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार सीमा हिरे यांनी खतप्रकल्पाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींचीही पाहणी केली. महापालिकेने तातडीने खतप्रकल्पाबाबत कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा हिरे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी एकनाथ नवले, अरुण वाजे, संदीप उगले, रविकिरण जाचक, प्रमोद महाजन, विजय पाटील, रवींद्र नवले व कैलास नवले आदि उपस्थित होते.