देवळा येथील खाद्यपदार्थात आढळले किडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 07:10 PM2019-08-24T19:10:18+5:302019-08-24T19:10:41+5:30

देवळा शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते स्वच्छतेचे कोणतीही मानक पाळत नाहीत, तसेच एका विक्रेत्याकडून घेतलेल्या सामोस्यामध्ये किडे आढळून आले असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवीदास कौतिक हिरे यांनी अन्न व औषध प्रशासन, तहसीलदार तसेच देवळा नगरपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Insects found in food at Deola! | देवळा येथील खाद्यपदार्थात आढळले किडे!

देवळा येथील खाद्यपदार्थात आढळले किडे!

googlenewsNext
ठळक मुद्देविक्र ेत्यावर कारवाईची मागणी; अन्न-औषध प्रशासनाचे नियम धाब्यावर

देवळा : शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते स्वच्छतेचे कोणतीही मानक पाळत नाहीत, तसेच एका विक्रेत्याकडून घेतलेल्या सामोस्यामध्ये किडे आढळून आले असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवीदास कौतिक हिरे यांनी अन्न व औषध प्रशासन, तहसीलदार तसेच देवळा नगरपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक व्यायसायिकांनी शहरात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळे सायंकाळच्या वेळेस या दुकानांच्या परिसरात खवय्यांची गर्दी असते; मात्र विक्रेते जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी अन्न व औषध प्रशासनाने निर्देशित केलेल्या मानकांचे कितपत पालन करतात हे सामोस्यामध्ये आढळलेल्या किड्यांवरून दिसून आले आहे. खाद्यपदार्थ विक्रेते सुरक्षेच्या उपाययोजना करीत नाहीत.
पूर्वी दिवाळीसारख्या सण-उत्सवात घरोघरी मिठाई व फराळाचे पदार्थ बनविले जात. सध्याच्या काळात घरी हे पदार्थ बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात तयार मिठाई खरेदीचे प्रमाण वाढले आहे. या पदार्थांना मागणी वाढल्यामुळे शहरात अनेक मिठाईची दुकाने सुरू झाली आहेत. ह्या मिठाईच्या दर्जाविषयी नाागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.
खाद्यतेलाचा सर्रासपणे पुनर्वापर करीत असल्याच्या तक्र ारी नागरिकांनी केलेल्या आहेत. याच तेलामध्ये भजी, वडे, सामोसे यांसारखे पदार्थ तळले जातात. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासनाचा रितसर परवाना काढणे गरजेचे आहे; मात्र कायदा धाब्यावर बसवून अनेक हातगाडीचालक बेधडकपणे खाद्यपदार्थांची विक्र ी करीत आहे.

Web Title: Insects found in food at Deola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.