३० दिवसांत घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश
By Admin | Updated: December 21, 2015 23:49 IST2015-12-21T23:45:20+5:302015-12-21T23:49:03+5:30
बाजार समिती : अहवाल सादर करावा

३० दिवसांत घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तक्रारींबाबत तसेच स्थगिती दिलेल्या ६४ कोटींच्या घोटाळ्याच्या तक्रारींबाबत येत्या ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार विभागाला दिले
आहेत.
सोमवारी (दि.२१) आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व धान्य वितरक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ६४ कोटींच्या घोटाळा प्रकरणात शासनाने या विषयाला स्थगिती दिली होती. आमदार देवयानी फरांदे यांच्यासह व्यापारी व धान्य वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल नागपूर येथे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांना ३० दिवसांत यासंदर्भात आदेश दिले. यावेळी शिष्टमंडळात आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बूब, विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, मनोज वडेरा, मनोज लोढा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)