स्मार्ट सिटीच्या कारभाराची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 03:59 PM2020-11-06T15:59:53+5:302020-11-06T16:08:25+5:30

नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली.

Inquire into the management of Smart City | स्मार्ट सिटीच्या कारभाराची चौकशी करणार

स्मार्ट सिटीच्या कारभाराची चौकशी करणार

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ यांची माहिती रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई 

नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली.  स्मार्ट सिटीच्या कामकाजाविषयी सध्या कंपनीचे संचालकच नाराज असून कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांच्या कारभाराविषयी महापौर सतीश कुलकर्णी यांनी थेट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार केली असून ऑगस्टमध्ये बदली झालेल्या थवील यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी
सांगितले की,  नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. याबाबत नाशिकच्या महापौरांनीच आता तक्रार केली आहे. खुद्द महापौरांनी तक्रार केली म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असून तथ्य असल्याशिवाय ते आरोप करणार नाही. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालू असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहे. त्यामुळे इगतपुरीच काय तर राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाई पासून वाचणार नाही  छगन भुजबळ यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाबाबत भुजबळ यांनी नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण फटाक्यातून अधिक वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन त्यांनी
नागरिकांना केले.

नागपूर येथील आमदार निवासात कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड चे विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी मागणी काही आमदार करीत आहे. आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो
निर्णय घेतील असे भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: Inquire into the management of Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.