शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

नादब्रह्म कलाविष्काराची रसिकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:44 IST

सृष्टीतल्या अनाहत ओंकार नादाला कथक नृत्यातून प्रतिसाद देत ‘नृत्यांगण’च्या आवर्तन संगीत समारोहात दुसºया दिवशी मंगळवारी (दि.३१) कीर्ती भवाळकर यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी ‘नादब्रह्म’ ही नृत्यरचना सादर केली. प्रारंभी नगरसेवक सतीश सोनवणे, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे वसंत चिफाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

नाशिक : सृष्टीतल्या अनाहत ओंकार नादाला कथक नृत्यातून प्रतिसाद देत ‘नृत्यांगण’च्या आवर्तन संगीत समारोहात दुसºया दिवशी मंगळवारी (दि.३१) कीर्ती भवाळकर यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी ‘नादब्रह्म’ ही नृत्यरचना सादर केली. प्रारंभी नगरसेवक सतीश सोनवणे, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे वसंत चिफाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘पंचतुंड नरकरुंड मालधर’ या नांदीने सुरुवात झालेल्या संगीत समारोहात सूर निरागस हो, मन मंदिरा, लागला गुरुभजनाचा छंद, ओंकार अनादी अनंत, ओंकाराचा छंद मला लागला आदी रचनांवर सादर केलेल्या कथक नृत्यशैलीतील कलाविष्काराने रसिकांना भुरळ घातली.  नादब्रह्म रचनेतून अभिनय व लयबद्ध पदन्यासाच्या माध्यमातून सादर केलेल्या नृत्याविष्काराने रसिकांची दाद मिळवली. संगीत सोहळ्याच्या दुसºया सत्रात निधी प्रभू यांनी कथक नृत्यशैलीतील कलाविष्कार सादर केला. त्यांनी गणेशस्तुतीने सादरीकरणाची सुरुवात केल्यानंतर ताल धमाल, ताल त्रिताल सादर करून कथकच्या पारंपरिक वस्तुक्रमानुसार नृत्यात विलंबिक, मध्य अणि ध्रुत लयीत थाट आमद, तोडे, तुकडे, परण, तिहाई, ततकार सादर केले. तसेच लयकारीच्या अंगाने जाणाºया विशेष तिश्र व मिश्र रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. धनेश जोशी यांच्या निवेदनाने संगीत सोहळ्यात रंगत भरली.