नादब्रह्म कलाविष्काराची रसिकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:44 IST2017-11-01T00:44:39+5:302017-11-01T00:44:44+5:30
सृष्टीतल्या अनाहत ओंकार नादाला कथक नृत्यातून प्रतिसाद देत ‘नृत्यांगण’च्या आवर्तन संगीत समारोहात दुसºया दिवशी मंगळवारी (दि.३१) कीर्ती भवाळकर यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी ‘नादब्रह्म’ ही नृत्यरचना सादर केली. प्रारंभी नगरसेवक सतीश सोनवणे, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे वसंत चिफाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

नादब्रह्म कलाविष्काराची रसिकांना भुरळ
नाशिक : सृष्टीतल्या अनाहत ओंकार नादाला कथक नृत्यातून प्रतिसाद देत ‘नृत्यांगण’च्या आवर्तन संगीत समारोहात दुसºया दिवशी मंगळवारी (दि.३१) कीर्ती भवाळकर यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी ‘नादब्रह्म’ ही नृत्यरचना सादर केली. प्रारंभी नगरसेवक सतीश सोनवणे, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे वसंत चिफाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘पंचतुंड नरकरुंड मालधर’ या नांदीने सुरुवात झालेल्या संगीत समारोहात सूर निरागस हो, मन मंदिरा, लागला गुरुभजनाचा छंद, ओंकार अनादी अनंत, ओंकाराचा छंद मला लागला आदी रचनांवर सादर केलेल्या कथक नृत्यशैलीतील कलाविष्काराने रसिकांना भुरळ घातली. नादब्रह्म रचनेतून अभिनय व लयबद्ध पदन्यासाच्या माध्यमातून सादर केलेल्या नृत्याविष्काराने रसिकांची दाद मिळवली. संगीत सोहळ्याच्या दुसºया सत्रात निधी प्रभू यांनी कथक नृत्यशैलीतील कलाविष्कार सादर केला. त्यांनी गणेशस्तुतीने सादरीकरणाची सुरुवात केल्यानंतर ताल धमाल, ताल त्रिताल सादर करून कथकच्या पारंपरिक वस्तुक्रमानुसार नृत्यात विलंबिक, मध्य अणि ध्रुत लयीत थाट आमद, तोडे, तुकडे, परण, तिहाई, ततकार सादर केले. तसेच लयकारीच्या अंगाने जाणाºया विशेष तिश्र व मिश्र रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. धनेश जोशी यांच्या निवेदनाने संगीत सोहळ्यात रंगत भरली.