इनोव्हा झाडावर आदळून अपघातात एक ठार
By Admin | Updated: July 12, 2016 22:43 IST2016-07-12T22:26:32+5:302016-07-12T22:43:40+5:30
इनोव्हा झाडावर आदळून अपघातात एक ठार

इनोव्हा झाडावर आदळून अपघातात एक ठार
नायगाव : ब्राह्मणवाडे-शिंदे रस्त्यावर इनोव्हा कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात ब्राह्मणवाडे येथील राजेंद्र धोंडीराम गिते (३०) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
गोदा युनियन कृषक संस्थेचे संचालक कैलास गिते यांचे बंधू राजेंद्र गिते हे इनोव्हा कारने (क्र. एमएच ०५ पीएफ ९७१४) शिंदे गावाकडून ब्राह्मणवाडे गावाकडे जात असताना वाघ वस्तीजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटून कार लिंबाच्या
झाडावर आदळली. या अपघातात राजेंद्र गिते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी राजेंद्र गिते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. (वार्ताहर)