नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या यादीवरील सराईत गुन्हेगार योगेश धुराजी हिवाळे (२३) याने मंगळवारी (दि.२) त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी मोबाईलद्वारे व्हिडिओ तयार करुन पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मजबुरीत फाशी घेत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, योगेश हा सातत्याने विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय होता. त्याच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात हाणामाऱ्यांसारखे शरिराविरुध्दचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपार प्रस्तावाची चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. याअगोदर एकदा त्याच्याविरुध्दचा तडीपारी आदेश रद्दही झाला होता. दरम्यान, योगेश याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत ''मला भद्रकालीच्या वराडे साहेबाने प्रचंड त्रास दिलेला आहे, तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहे, तुला जेवढे जगायचे आहे, तेवढे जगून घे...त्यांनी मला खुप त्रास दिला आहे, त्यांनी फाशी घ्यायला मला मजबुर केलं आहे, माझ्या आई-वडीलांना, भावाला त्रास करु नका, वराडे साहेबांनीच मला त्रास दिला आहे, बाकी कुणी नाही'' असे योगेश व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभर हा व्हिडिओ सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होता. पोलिसांच्या छळाला कंटाळून युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडओमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या अकस्मात मृत्यूचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट-१कडे वर्ग करण्यात आला असून ते याबाबत पुढील तपास करणार आहे.
सराईत गुन्हेगाराने लावला गळफास; पोलीसाच्या त्रासाला कंटाळून फाशी घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 15:28 IST
मंगळवारी दिवसभर हा व्हिडिओ सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होता. पोलिसांच्या छळाला कंटाळून युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडओमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सराईत गुन्हेगाराने लावला गळफास; पोलीसाच्या त्रासाला कंटाळून फाशी घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
ठळक मुद्देराहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार