कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 09:13 PM2021-05-12T21:13:52+5:302021-05-13T00:24:16+5:30

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.

Ingredients for making onion chaal | कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

Next
ठळक मुद्देशेतातील कांद्दाची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.

कडक लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविवण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हि करोना महामारी समाप्त होईल, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
कांदा लागवडीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे वाया गेल्याने जे रोप जगली त्यात कांदा लागवड करण्यात आली. पिकलेल्या कांद्याला भाव कमी असल्याने तसेच सध्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदा साठवणूक करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
कांदाचाळ बनविण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहेत. मात्र ऐन उन्हाळ् कांदा काढणीच्या हंगामात झालेल्या लॉकडाउन मुळे, कांदा चाळ बनविवण्यासाठी लागणारी ॲगल, पट्टी,जाळी, पत्रे, विटा सिमेंट यासारखी साधनसामग्री सध्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा कडक उन्हात पडुन आहे.

उन्हाने कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन मोठा तोटा सहन करावा लागेल काही शेतकरी मात्र शेतातच झाडाच्या सावलीत कांद्याची पोळ मारुन ठेवताना दिसत आहेत.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी...... प्रत्येकाला कांदा चाळ...... पण.. तीही ऑनलाईन अर्ज भरून.... शेतकरी कसा अर्ज भरणार..... मग ह्या चाळी शेतकऱ्यांना मिळणार कधी... कृषि अधिकारीच काय पण कृषी सहाय्यक पण शेतकरी वर्गाला भेटत नाही. म्हणे लॉगडाऊन आहे. आता बियाणे मोफत देणार.. पण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा पण शेतु कार्यालयही बंद मग बियाणे कसे मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने केली आहे.

(१२ निऱ्हाळे, १)

चाळीविना झाडाच्या सावलीत पडलेला कांदा.

Web Title: Ingredients for making onion chaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.