भाडेकरुंची माहिती लपविली; पाच घरमालकांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:17 IST2018-03-25T00:17:32+5:302018-03-25T00:17:32+5:30
भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या पांडवनगरी परिसरातील अपार्टमेंटमधील पाच घरमालकांवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत़

भाडेकरुंची माहिती लपविली; पाच घरमालकांवर गुन्हे
इंदिरानगर : भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या पांडवनगरी परिसरातील अपार्टमेंटमधील पाच घरमालकांवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत़ सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाºयांसाठी अडीच हजार सदनिका बांधण्यात आल्या़ यातील सुमारे ७५ टक्के सदनिका या भाडेतत्त्वावर दिल्या असून, मूळ घरमालक हे बाहेरगावी स्थायिक झाले आहेत़ विशेष म्हणजे या सदनिका भाडेतत्त्वावर दिल्यामुळे या ठिकाणी कोण राहते, काय करते याचा पत्ता लागत नाही़ पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत परिसरातील अपार्टमेंटला नोटिसा लावून भाडेकरुंची माहिती कळविण्याबाबत आवाहन केले़ मात्र, याकडे दुर्लक्ष करणारे पांडवनगरी परिसरातील अर्जुन अपार्टमेंटमधील घरमालक लतीफ मोहम्मद पटेल, दिलीप सखाहरी खताळ, चौधरी सोना बापू, भगवान चंदू लोटे, नानासाहेब रामजी साबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ सदनिका भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती पोलीस ठाण्यास माहिती न कळविल्याबाबत या पाच संशयितांवर पोलीस आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली केल्यांचा भांदवि १८८ नुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ इंदिरानगर परिसरातील घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यात देऊन आणि कारवाई टाळण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्यायहळदे यांनी केले आहे़