इंदोरे येथे घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 18:32 IST2019-12-06T18:31:20+5:302019-12-06T18:32:00+5:30
गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत.

इंदोरे येथे घरकुल बांधणीबाबत मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी किरण जाधव.
घोटी : गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत. इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी मार्गदर्शन करतांना इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक घरकुल मंजूर असणारे गाव इंदोरे असल्याचे सांगितले.
या बैठकीत घरकुल योजनेंतर्गत आलेले अनुदान किती टप्प्यात मिळणार व ते कसे वापरावे हे सांगितले. गाव कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असल्यामुळे घरकुल तसेच शौचालय व शोषखड्डा बांधताना भविष्याचा विचार करून जर पर्यटक आणि गिर्यारोहक यांच्यासाठी एक रूम जास्तीची काढली तर तिच रूम पर्यटकांसाठी निवारा व मुक्कामाचे साधन होईल. त्यामुळे भविष्यात उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, विस्तार अधिकारी संजय पवार, सरपंच जनार्दन शेणे, ग्रामसेवक संदीप वसावे, ग्राम परिवर्तक किशोर राक्षे, सदस्य पंढरीनाथ धादवड, नथू पिचड तसेच गावातील पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.