पल्स पोलिओ मोहिमेतून साडेचार लाख बालकांना लसीकरण सीईओ सुखदेव बनकरांची माहिती
By Admin | Updated: January 18, 2015 01:41 IST2015-01-18T01:41:08+5:302015-01-18T01:41:45+5:30
पल्स पोलिओ मोहिमेतून साडेचार लाख बालकांना लसीकरण सीईओ सुखदेव बनकरांची माहिती

पल्स पोलिओ मोहिमेतून साडेचार लाख बालकांना लसीकरण सीईओ सुखदेव बनकरांची माहिती
नाशिक : उद्या (दि.१८) रविवारी जिल्'ात विशेष राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील चार लाख ३३ हजार, तर मालेगाव व नाशिक महापालिका क्षेत्रातील ५१ हजार ७३५ अशा एकूण ४ लाख ८५ हजार ६८ बालकांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत डोस पाजण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. जिल्हा पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे व सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी सांगितले. जिल्'ात या पल्स पोलिओ मोहिमेसाठी तीन कर्मचारी असलेले १७२६ बूथ ग्रामीण भागात, तर १९४ बूथ मालेगाव व नाशिक महापालिका हद्दीत लावण्यात येणार आहेत. तसेच दोन कर्मचारी असलेले १३८२ बूथ लावण्यात येणार आहेत. एकूण दोन व तीन कर्मचारी असलेले शहर व ग्रामीण भाग मिळून जिल्'ात ३३०२ बूथ लावण्यात येणार असून, त्यावर सुमारे दहा हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.