राजापूर येथे कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:13 IST2021-03-18T19:06:41+5:302021-03-19T01:13:26+5:30

राजापूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. राजापूर व परिसरातील गावच्या ४२ नागरिकांनी स्वॅप चाचणी करून घेतली, त्यापैकी राजापूर गावात तीन कोरोनाबाधित तर खरवंडी येथे दोन जण कोरोनाबाधित आढळून आले.

Infiltration of Corona at Rajapur | राजापूर येथे कोरोनाचा शिरकाव

राजापूर येथे कोरोनाचा शिरकाव

ठळक मुद्दे दोन जण कोरोनाबाधित आढळून आले.

राजापूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. राजापूर व परिसरातील गावच्या ४२ नागरिकांनी स्वॅप चाचणी करून घेतली, त्यापैकी राजापूर गावात तीन कोरोनाबाधित तर खरवंडी येथे दोन जण कोरोनाबाधित आढळून आले.

कोरोनाबाधित निघालेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात औषध उपचार करून घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. गावात बरेच नागरिक हे विनामास्क गावात फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी कोरोनापासून दूर राहण्यासाठी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन सरपंच नलिनी मुंडे व सदस्यांनी केले आहे.

Web Title: Infiltration of Corona at Rajapur