पिंपळगावला कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:07 IST2020-06-09T22:22:37+5:302020-06-10T00:07:52+5:30
पिंपळगाव बसवंत : गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून ३४ वर्षीय तरु ण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चांदवड ...

पिंपळगावला कोरोनाचा शिरकाव
पिंपळगाव बसवंत : गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून ३४ वर्षीय तरु ण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
चांदवड येथे ट्रॅक्टर खरेदी-विक्रीच्या व्यवसायानिमित्त सततच्या प्रवासादरम्यान या युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय आहे. त्यास चार ते पाच दिवसांपूर्वी कोरोनासदृश लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यास ५ जून रोजी कोविड देखभाल केंद्रात दाखल करण्यात आले. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
सोमवारी (दि.८) तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला लागलीच पुढील उपचारासाठी लासलगाव रु ग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपळगावात कोरोनाचा रुग्ण मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कातील पत्नी व लहान मुलास पिंपळगाव कोविड केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.