सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:47 IST2020-07-14T17:46:54+5:302020-07-14T17:47:18+5:30
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात मका पिकापाठोपाठ सोयाबीन पिकावरही पाने पोखरणाºया हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पिकाची वाढ खुंटू लागली असल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. उंट अळी बरोबरच खोड पोखरणारी अळी, तसेच पानाची गुंडाळी करणाºया अळीचाही प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव
पाटोदा (गोरख घुसळे ) : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात मका पिकापाठोपाठ सोयाबीन पिकावरही पाने पोखरणाºया हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पिकाची वाढ खुंटू लागली असल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. उंट अळी बरोबरच खोड पोखरणारी अळी, तसेच पानाची गुंडाळी करणाºया अळीचाही प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. सोयाबीन जगविण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करीत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत आहे.
येवला तालुक्यात यावर्षी सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. उंट अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सोयाबीन पिक क्षेत्र बाधित होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आगद पिकास फुलोरा लागण्यास सुरु वात झाली आहे.मात्र उंट अळी ही सोयाबीन पिकाचे पाने कुरतडून पानाच्या जाळ्या करीत आहे. पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.