अपात्र प्राध्यापक : विद्यापीठाच्या ‘विषय संप्रेषण’ पदवीच्या समकक्षतेचा प्रश्न

By Admin | Updated: July 23, 2015 23:52 IST2015-07-23T23:51:45+5:302015-07-23T23:52:09+5:30

मूळ पदव्युत्तर पदवीच अमान्य, मग पीएचडीचे काय?

Ineligible Professor: The question of the equivalent of the subject 'Communication of the subject' | अपात्र प्राध्यापक : विद्यापीठाच्या ‘विषय संप्रेषण’ पदवीच्या समकक्षतेचा प्रश्न

अपात्र प्राध्यापक : विद्यापीठाच्या ‘विषय संप्रेषण’ पदवीच्या समकक्षतेचा प्रश्न

नाशिक : मुक्त विद्यापीठाने विशिष्ट कर्मचाऱ्यांवर मेहरनजर दाखवताना मूळ विषयातील पदवी आणि त्याच्याशी असंबंध एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. या पदव्युत्तर पदवीच्या आधारे पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश दिला खरा; परंतु विद्यापीठाच्या संप्रेषण आणि दूरशिक्षण पदवी ही अन्य विद्यापीठाशी समकक्ष नाही. म्हणजे उदरनिर्वाहासाठी कोठेही पदवी दाखविली तर त्याच्या आधारे रोजगार मिळणार नाही. मग अशा पदवीच्या आधारे पूर्ण केलेले शिक्षण आणि त्या आधारे मिळविलेली पीएच.डी. ही बाहेरील उमेदवारांना कितपत उपयुक्त ठरणार? परंतु मुक्त विद्यापीठाने आपल्या सेवांतर्गत आणि विशिष्ट उमेदवारांना या पदवीचा चांगला उपयोग करून दिला आणि त्या आधारे अनेकांना महत्त्वांच्या पदावर नियुक्त केले आहे.
वंचितांसाठी स्थापन झालेल्या मुक्त विद्यापीठात जवळपास तीनशे कर्मचारी आहेत; परंतु त्यापैकी शैक्षणिक पदांवर कामे करणाऱ्या आणि सेवेत राहून याच विद्यापीठाच्या पदव्या घेऊन तेथेच पदोन्नतीने स्थायी स्वरूपात नियुक्त होणे हे या विद्यापीठाच्या आजवरच्या प्रशासकीय कारभारातील वैशिष्टच आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही नियमावली तयार केली आहे; परंतु तीच धाब्यावर बसवून वा ती आपल्या सोयीने वापरून (वाकवून) विद्यापीठाने विशिष्ट अधिकाऱ्यांची मोठी सोय केली आहे. मूळ कोणत्याही विषयात पदवी धारण केल्यानंतर पदव्युत्तर पदवी त्याच विषयांत आणि पीएच.डी.ही त्याच विषयात पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठातील बहुतांशी प्राध्यापकांनी मूळ विषयातील पदवीनंतर पदव्युत्तर पदवी याच विद्यापीठात घेतली.
विद्यापीठाच्या शैक्षणिक सेवा विभागामार्फत एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी या संप्रेषण आणि दूर शिक्षणपद्धतीच्या पदव्युत्तर पदव्या आहेत. त्यांना इतर विद्यापीठातील पदव्युुत्तर पदवीची समकक्षता नाही. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १९९३ आणि महाराष्ट्र शासनाच्या १८ मार्च १९९८च्या निर्णयानुसार या पदव्यांना दोन प्रशिक्षण वर्गांची समकक्षता धरण्यात येते. जे अधिव्याख्याता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील एम.ए., एम.कॉम, व एम.एस्सी (संप्रेषण आणि दूरशिक्षण क्षेत्रातील) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होतील त्यांना शासन आदेशान्वये चार आठवड्यांचे दोन उजळणी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सूट देण्यात येते. त्यानुसार मुक्त विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करून सूट मिळवली व याच पदवीच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश मिळविला. त्यांनाही विद्यापीठाने विनासायास प्रवेश देऊन पीएच.डी. पदव्या सन्मानपूर्वक प्रदान केल्या आहेत.
विशेष म्हणजे एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी (संप्रेषण व दूरशिक्षण) या तिन्हींचा अभ्यासक्रम सारखाच असून, त्यातील विषयांची नावेही एकसारखी आहेत. मूल्यमापन पद्धती सारख्याच असून, त्यात कोणताही फरक नाही. मग, विद्यापीठ अशा वेगवेगळ्या नावाने वर पदव्या का सुरू ठेवत आहे, हे अनाकलनीय कोडे विद्यापीठ वर्तुळातील जाणकारांना पडले आहे. या पदव्यांच्या आधारेच रुचा गुजर, सुनंदा मोरे यांच्यासारख्या काही प्राध्यापकांनी हीच पदव्युत्तर पदवी घेऊन त्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेतला. विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे संचालक मनोज किल्लेदार हे एम.ई. इलेक्ट्रीकल्स असताना त्यांनी पीएच.डी. दूरस्थ पदवी संपादन केली आणि त्याचे सर्व लाभ घेतले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Ineligible Professor: The question of the equivalent of the subject 'Communication of the subject'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.