शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

उद्योगांचा आॅक्सिजन पुरवठा रुग्णांसाठी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:22 IST

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आॅक्सिजनची भासत असलेली टंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी जिल्'ातील उद्योगांसाठी वापरण्यात येणारे आॅक्सिजन पुरवठा खंडित करून तो रुग्णांसाठी वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या संदर्भात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी सर्व उद्योगांना तसे आदेशही दिले आहेत. ज्या उद्योगांमध्ये आॅक्सिजनचा वापर होतो, त्यांच्याकडील रिकामे सिलिंडरदेखील जमा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देटंचाई दूर करण्याचा प्रयत्न : रिकामे सिलिंडरही ताब्यात घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आॅक्सिजनची भासत असलेली टंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी जिल्'ातील उद्योगांसाठी वापरण्यात येणारे आॅक्सिजन पुरवठा खंडित करून तो रुग्णांसाठी वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या संदर्भात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी सर्व उद्योगांना तसे आदेशही दिले आहेत. ज्या उद्योगांमध्ये आॅक्सिजनचा वापर होतो, त्यांच्याकडील रिकामे सिलिंडरदेखील जमा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.गेल्या आठवड्यापासून शहर व जिल्'ात आॅक्सिजनची कमतरता भासत असून, त्यामुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सारखीच परिस्थिती असून, मुंबईहून आॅक्सिजनचा पुरवठाच होत नसल्याची पुरवठा दारांची ओेरड आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या, परंतु ठोस कार्यवाही होत नव्हती. उलटपक्षी दिवसेंदिवस आॅक्सिजनचा तुटवडा अधिकच जाणवू लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ येऊन ठेपते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. परिणामी कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या पोटात भीतीचा गोळा उठू लागला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात नाशिकसह जिल्'ातील औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आॅक्सिजनचा पुरवठा बंद करून तो आरोग्यासाठी तातडीची बाब म्हणून ताब्यात घेण्याचे ठरविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार जिल्'ात दररोज सहा ते सात टन आॅक्सिजन उद्योगांमध्ये वापरला जात असून, हाच पुरवठा रुग्णालयांसाठी वापरल्यास मोठी टंचाई दूर होऊन रुग्णांचे जीव वाचविण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्'ातील आॅक्सिजन उत्पादक, पुनर्भरण करणारे व ज्या उद्योगांना आॅक्सिजन पुरवठा केला जातो त्यांनी तूर्त उद्योगांचा पुरवठा बंद करून वैद्यकीय कारणास्तव तो उपलब्ध करून द्यावा. आरोग्य यंत्रणेसाठी पुरेसा आॅक्सिजनचा पुरवठा झाल्यास अतिरिक्तआॅक्सिजन उद्योगांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे पुरवठादारांनी उद्योगांकडील रिकामे सिलिंडरदेखील ताब्यात घ्यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सदर आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापक कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी दिल्या आहेत. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त, औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी