शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

औद्योगिक वसाहतीत मिनी मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:02 IST

निमा व सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पोहोचवून ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. महिला खुल्या गटात काजल नामदेव दळवी तर व पुरुष गटात दिनकर संतू लिलके यांनी निमा मॅरेथॉन २०१८ चे विजेतेपद पटकावले.

सिन्नर : निमा व सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पोहोचवून ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. महिला खुल्या गटात काजल नामदेव दळवी तर व पुरुष गटात दिनकर संतू लिलके यांनी निमा मॅरेथॉन २०१८ चे विजेतेपद पटकावले.  आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर आमदार सुधीर तांबे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, एस.के. नायर, संदीप भदाणे, अरुण चव्हाणके, किशोर इंगळे, मारुती कुलकर्णी, सुभाष कदम, शिवाजी आव्हाड, योगेश मोरे, सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, चिटणीस बाळासाहेब लोंढे, अविनाश पगारे आदी उपस्थित होते.  १३ वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन केले जात असून, लहान वाटणाºया स्पर्धेने व्यापक रूप धारण केले असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. १४ व्या मॅरेथॉन स्पर्धेत निमाने मोठे योगदान दिले आहे. स्पर्धेतून आतापर्यंत विविध खेळाडू राज्य व देशपातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खेळाडू घडविणारी असल्याचे ते म्हणाले. विविध कारणांनी स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.  औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कर्मचारी व कामगारांना दैनंदिन कामाव्यतिरिक्त व्यायाम, स्वच्छता याबाबत जागरुकता होण्यासाठी स्पर्धा घेतल्याचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले. भविष्यातही अशा स्पर्धा घेणार असल्याचे प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले.  स्पर्धेसाठी जिंदाल सॉ लि., मॅक फर्माटेक प्रा.लि., नूपुर इंडस्ट्रिज, ग्लोबल पॅकेजिंग, देश वायर प्रॉडक्ट्स प्रा. लि., रेसिस्टोटेक इंडस्ट्रिज प्रा.लि. यांनी सहकार्य केले. माधुरी पंडित यांनी सूत्रसंचालन केले.  सुधीर बडगुजर यांनी आभार मानले.स्वच्छतेचा संदेशऔद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी निमा व सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्र वारी ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी जिल्ह्यातून सुमारे २ हजार खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही अशा स्पर्धा घेणार असल्याचे प्रास्ताविकातून याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांसमोर सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक