इंद्रजीत लोणारी, कावेरी आहेर यांची राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:33 PM2019-10-05T21:33:09+5:302019-10-05T21:35:24+5:30

येवला : धुळे येथील विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येवला शहरातील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी इंद्रजीत प्रवीण लोणारी याने चौदा वर्षाच्या आतील मुलांच्या ७४ किलो वजन गटात, तर तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कावेरी नंदू आहेर हिने चौदा वर्षाच्या आतील मुलींच्या ३३ किलो वजनी गटात बाजी मारत प्रथम क्र मांक पटकावला.

Indrajit Lovati, Kaveri Aher selected for state level school wrestling | इंद्रजीत लोणारी, कावेरी आहेर यांची राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

इंद्रजीत लोणारी

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

येवला : धुळे येथील विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येवला शहरातील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी इंद्रजीत प्रवीण लोणारी याने चौदा वर्षाच्या आतील मुलांच्या ७४ किलो वजन गटात, तर तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कावेरी नंदू आहेर हिने चौदा वर्षाच्या आतील मुलींच्या ३३ किलो वजनी गटात बाजी मारत प्रथम क्र मांक पटकावला.
या दोघांची पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
धुळे येथील विभागीय क्र ीडा संकुलात नुकतीच नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांमधून पात्र ठरलेल्या चौदा वर्षांच्या आतील मुले व मुलींच्या विविध दहा वजन गटात फ्रीस्टाइल कुस्त्या झाल्या. स्पर्धेत जवळपास शंभर शालेय मुले व मुलींचा सहभाग होता.
स्पर्धेत चौदा वर्षांच्या आतील मुलांच्या ७४ किलो वजन गटात नाशिक जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करणार्या येवला शहरातील कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाचा शाळकरी युवा मल्ल इंद्रजीत प्रवीण लोणारी याने ढाक, भारंदाज, कलाजंग, मोळी आदी डावांचे दर्शन घडवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवले. तर, मुलींच्या ३३ किलो वजन गटातून तालुक्यातील पाटोदा येथील कावेरी नंदू आहेर हिने देखील प्रेक्षणीय कुस्त्या करत स्पर्धेत बाजी मारली. धुळे येथील विभागीय स्पर्धेत यश संपादन केलेले इंद्रजित लोणारी व कावेरी आहेर हे दोघे आता आळंदी (जि. पुणे) येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत आपापल्या वजन गटातून नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
इंद्रजित लोणारी व कावेरी आहेर हे येवल्यातील कै. भाऊलाल पैलवान लोणारी क्र ीडा संकुलात कुस्तीचे धडे गिरवतात. त्यांना उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी, महाराष्ट्र चॅम्पियन विजय लोणारी, प्रविण लोणारी, खंडू साताळकर, अर्जुन कवाडे, निखिल सांबर, दीपक लोणारी, रामेश्वर भांबारे यांचेसह डिपॉल स्कुलचे प्राचार्य जोमी जोसेफ, क्र ीडा शिक्षक परविंदर रिसम, तालुका क्र ीडा अधिकारी गीता साखरे, तालुका क्र ीडा संयोजक नवनाथ ऊंडे, पाटोदा जनता विद्यालयाचे प्राचार्य दाभाडे व क्र ीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Indrajit Lovati, Kaveri Aher selected for state level school wrestling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.