इंदिरानगर : थकबाकीदार विरोधात मोहीममनपाकडून पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:28 IST2017-11-13T00:28:29+5:302017-11-13T00:28:34+5:30

येथील महापालिकेच्या उपकार्यालयाच्या वतीने सुमारे तेराशे पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या, तसेच २५ थकबारीदारांची तात्पुरत्या स्वरूपात नळजोडणी तोडण्यात आली.

Indiranagar: Notices to the water-tank offenders against the defaulters | इंदिरानगर : थकबाकीदार विरोधात मोहीममनपाकडून पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

इंदिरानगर : थकबाकीदार विरोधात मोहीममनपाकडून पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

इंदिरानगर : येथील महापालिकेच्या उपकार्यालयाच्या वतीने सुमारे तेराशे पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या, तसेच २५ थकबारीदारांची तात्पुरत्या स्वरूपात नळजोडणी तोडण्यात आली.
मनपाच्या उपकार्यालयाच्या थकबारीदारांविरोधात धडक मोहीम राबण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यापैकी १00 थकबाकीधारकांनी तातडीने थकबाकी भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. सदर धडक मोहिमेत सुमारे पंचवीस हजार रुपये रोख व सुमारे पंचावन्न हजारांचा धनादेश अशी वसुली करण्यात आली आहे. तसेच धडक मोहीम सुरूच राहणार असल्याने तातडीने पाणीपट्टी थकबाकीदारांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
सदर मोहीम मनपा उपायुक्त रोहिदास दोरकूळकर, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता जी. बी. पगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी राबविण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Indiranagar: Notices to the water-tank offenders against the defaulters