इंदिरानगरला उल्लंघन करणाऱ्यांकडून चार लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:15 IST2021-04-22T04:15:04+5:302021-04-22T04:15:04+5:30

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने १ ते २० एप्रिल दरम्यान मास्क न लावता फिरणाऱ्या ४१३ निष्काळजी नागरिकांकडून २ लाख ...

Indiranagar fined Rs 4 lakh for violators | इंदिरानगरला उल्लंघन करणाऱ्यांकडून चार लाखांचा दंड वसूल

इंदिरानगरला उल्लंघन करणाऱ्यांकडून चार लाखांचा दंड वसूल

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने १ ते २० एप्रिल दरम्यान मास्क न लावता फिरणाऱ्या ४१३ निष्काळजी नागरिकांकडून २ लाख सहा हजार पाचशे रुपये, वेळेचे बंधन न पाळणाऱ्या एकोणवीस आस्थापनाधारकांकडून ९५ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १३ निष्काळजी नागरिकांना १३ हजार रुपये, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८२ निष्काळजी नागरिकांवर ८२ हजार रुपये, तर मास्क न वापरणाऱ्या २८ नागरिकांवर १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या १४१ नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असता त्यापैकी चार जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना केअर सेंटरला पाठवण्यात आले. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सतीश जगदाळे, जावेद शेख, सहअधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबवली आहे.

Web Title: Indiranagar fined Rs 4 lakh for violators