इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष
By Admin | Updated: May 17, 2014 00:18 IST2014-05-17T00:01:45+5:302014-05-17T00:18:15+5:30
इंदिरानगर : अब की बार मोदी सरकार, जय भवानी-जय शिवाजी यांसारख्या गगनभेदी गर्जना देत इंदिरानगर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी मिठाईचे वाटप करीत महायुतीचे विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजयोत्सव साजरा केला.

इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष
इंदिरानगर : अब की बार मोदी सरकार, जय भवानी-जय शिवाजी यांसारख्या गगनभेदी गर्जना देत इंदिरानगर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी मिठाईचे वाटप करीत महायुतीचे विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजयोत्सव साजरा केला.
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मतमोजणीमध्ये सकाळपासून आघाडी मिळत गेल्याने समर्थक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दुपारी साडेबारा- एकच्या सुमारास अंतिम निकालाची प्रतीक्षा न करताच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगर कक्ष व भाजपाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व ढोल-ताशांच्या गजरात मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गायकर, राजश्री शौचे, संजय करिपुरे, संदीप गिते, प्रकाश चौधरी, मनोज पाटील, अजय महाले आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पाथर्डी फाटा व पाथर्डी गाव येथे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुदान डेमसेंसह शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटप केले. नगरसेवक वंदना बिरारी, देवानंद बिरारी यांनीही प्रभागात मिठाईचे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. वासननगर येथेही शिवसेनेतर्फे फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी राम बडगुजर, सुजय पाटील, आकाश चोर, प्रदीप खताळे, गणेश बडवे आदि उपस्थित होते.