इंदिरानगर परिसर : पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव पाणीपुरवठा सुरळीत होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:46 IST2018-04-02T00:46:53+5:302018-04-02T00:46:53+5:30
इंदिरानगर : पांडवनगरी, वडाळागाव, कलानगर व राजीवनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

इंदिरानगर परिसर : पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव पाणीपुरवठा सुरळीत होईना
इंदिरानगर : पांडवनगरी, वडाळागाव, कलानगर व राजीवनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी अधिकाºयांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले होते. मात्र अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. तसेच होळीच्या दिवशी पाण्यासाठी बोंबाबोंब करूनसुद्धा परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक ३० मधील पांडवनगरी, शिवकॉलनी, श्रद्धाविहार कॉलनी, राजीवनगर, अरुणोदय सोसायटी, महारुद्र कॉलनी, मानस कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी यांसह संपूर्ण प्रभागात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला गेल्या एक वर्षापासून नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नळांना कमी दाबाने पाणी येत असल्याने पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम होत नाही तर वापरण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्नच नाही. त्यात उन्हाचा तडाखा वाढतच असून, चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण प्रभागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने होळी सणाच्या दिवशी शेकडोच्या संख्येने संतप्त महिला आणि प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी पाणीपुरवठा अधिकाºयांना सुमारे दोन तास घेराव घातला होता. पाणीपुरवठा अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु आंदोलकांची पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली.