शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी उमेदवार नाही, मग काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:11 IST

व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’

आठवणीतील निवडणूक

व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. लाट इंदिरा कॉँग्रेसची. मी नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातील कॉँग्रेस आयचा उमेदवार. निफाड मतदारसंघात पालखेड मिरचीचे गाव. तेथील मतदान केंद्रावर एक आंधळी म्हातारी मतदानासाठी आली. वाट दाखविण्यासाठी सोबत तिचा नातू होता. आंधळ्या व्यक्तींना मतदान करण्यासाठी निवडणूक केंद्र अधिकाऱ्याने मदत करावी, असा नियमच आहे. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’ केंद्रप्रमुख चलाख होते, आजींची इच्छा त्यांच्या लक्षात आली. ते म्हणाले ‘आजी इंदिरा गांधींची निशाणी तुम्हाला माहिती आहे का? आजी म्हणाली ‘हो. इंदिराबार्इंची निशाणी आहे, गाय-वासरू.’ केंद्रप्रमुख म्हणाले येथे गाय-वासरू आहे, काय करू? आजी म्हणाली ‘गाय-वासरावर शिक्का मार.’ त्यावेळी व्होटिंग मशीन्स नव्हत्या, शिक्का मारावा लागे.आता वर्ष यंदाच्या लोकसभेचे. निवडणुका लोकसभेच्या. लाट मोदींची. मतदारसंघ दिंडोरी. नांदगाव तालुक्यातील बाणगावचे मतदानकेंद्र. एक अंध म्हातारी नातवाला घेऊन मतदानकेंद्रावर आली. केंद्रप्रमुखाने विचारले ‘आजी कुणाला मत देऊ?’ आजीबाई म्हणाल्या ‘कमळाला’. अधिकारी स्वत:च्या जागेवरून उठला. व्होटिंग मशीनजवळ आला व कमळाचे चिन्ह शोधण्यासाठी थोडे खालीवर बघू लागला. ती त्याला म्हणाली ‘ए खालीवर काय पाहतोस ? नीट कमळ दाब, तुला काय वाटलं ? मी भीत (पूर्ण) आंधळी आहे काय ? मला थोडं थोडं दिसतंय.’ दोन्ही वयस्कर आणि अशिक्षित महिला. दोघींचाही निर्धार पक्का. कुणाला मत द्यायचे त्याचा. जेव्हा भारतीय मतदार एका निर्णयावर येतो, तेव्हा ती त्याची इच्छा असते. आपण तिला लाट म्हणतो. विविध निवडणुकांच्या वेळी अशा वेगवेगळ्या लाटा आल्याचे आपण अनुभवले आहे. या सर्व यशापयशाचे कारण ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियाचा वाढता वापर किंवा कांद्या बटाट्याचे भाव नव्हेत. या सर्वांचे श्रेय जाते, ते फक्त भारतीय मतदारांच्या सामूहिक शहाणपणाला.विनायकदादा पाटील

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vinayakrao Patilविनायकराव पाटीलniphad-acनिफाद