शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल : दंडकारण्य नव्हे; ओसाड नाशिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 18:01 IST

दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देघनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र नष्ट ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्यची गरजसाडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले

नाशिक : रामायणकाळात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकची ओळख काळानुरूप नष्ट झाली असून हे भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) या राष्ट्रीय संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. नाशिकचे १५ हजार ५३० चौरस किलोमीटर इतके भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी केवळ साडेतीनशे चौ.किमी क्षेत्र मध्यम जंगलाने व्यापलेले आहेत. उर्वरित ७१८ चौ.किमी क्षेत्र ओसाड झाले आहे. घनदाट जंगलाचे प्रमाण मात्र शुन्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून आता नाशिककरांनी खºया अर्थाने ‘देवराई’ विकसीत करण्याचा विडा उचलणे गरजेचे आहे.दंडकारण्य असलेले नाशिक कालौघात ओसाड होत गेले असून विविध विकासकामे तसेच शहरीकरणामुळे होणार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी वनमहोत्सवांतर्गत जरी वन मंत्रालयाकडून कोटीच्या कोटी वृक्षलागवडीचे उड्डाण केले जात असले तरी प्रत्यक्षात नाशिकचे जंगलाचे क्षेत्र विरळच आहे. वृक्षारोपणाचा शासकीय आकडा मांडला जातो मात्र रोपांचे संवर्धन करत वृक्षांमध्ये रुपांतर झाल्याचा आकडा शासकिय स्तरावरुन पुढे येत नाही ही शोकांतिका आहे.घनदाट जंगलाचे नाशिकला लाभलेले क्षेत्र संपुर्णत: नष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण अनुभवयास येईल का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. निसर्गप्रेमी नाशिककरांनी ख-या अर्थाने वृक्षलागवड व संवर्धनासाठी भरीव कार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वनसंपदा नष्ट होत असून वनविभागालाही ती वाढविणे अशक्य होत आहे. वनविभागाला जोपर्यंत लोकसहभागाची जोड मिळणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याचे वनसंवर्धन होणे अशक्य असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. झाडे लावणे, ती जगविणे आणि सांभाळणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी आहे, असा गैरसमज नाशिककरांना काढून टाकावा लागणार आहे. कारण २०१५नंतर भारतीय वन सर्वेक्षण या राष्ट्रीय संस्थेकडून प्रसिध्द झालेल्या अहवालामधून राज्यासह नाशिकची वनस्थिती चिंताजनक असल्याचे समोर येते.

देवराई-वनराई’ उपक्रम करणार मातशहरात आपलं पर्यावरण संस्थेने तीन ते चार वर्षांपुर्वी देवराई व वनराई निर्मितीसाठी पुढाकार घेत वनविभागाच्या ओसाड वनक्षेत्रावर लोकसहभागातून वृक्षारोपण करुन संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. सातपूर येथे देवराई व म्हसरुळ येथील वनराईमध्ये अनुक्रमे अकरा हजार व साडे पाच हजार रोपांचे संगोपन मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. रोपट्यांचे वृक्षांमध्ये रुपांतर होऊ लागले आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :forestजंगलNashikनाशिकenvironmentवातावरण