भारतीय नृत्यशैलीचे सादरीकरण
By Admin | Updated: February 3, 2016 21:58 IST2016-02-03T21:58:18+5:302016-02-03T21:58:52+5:30
कळवण : देश-विदेशातील सहजयोगींचा सहभाग

भारतीय नृत्यशैलीचे सादरीकरण
भऊर : परमपूज्य माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग परिवाराच्या १० देशांतील परदेशी युवक व युवतींनी भारतीय संगीत, गायन, वादन व नृत्याच्या माध्यमातून योग व ध्यानाचा प्रचार-प्रसार करून भारतीय संस्कृती व परंपरेचे सादरीकरण केले.
कळवण येथील नाकोडारोडवरील श्री साई लॉन्स येथे सहजयोग परिवाराच्या वतीने आत्मसाक्षात्कार, सहज संगीत व ध्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतासह युक्रेन, रशिया, चीन, ब्रिटन, इटली, स्पेन, बेल्जीयम, सिंगापूर, कॅनडा या १० देशांतील परदेशी सहजयोगी पाहुण्यांनी भारतीय मराठी, हिंदी भाषेत सहजयोगाची भजने, सहज संगीत व नृत्य प्रदर्शित केले.
माताजी निर्मलादेवी सहजयोग राष्ट्रीय ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय युवाशक्तीचा हा भारत दौरा आठ राज्यांतील २० शहरात होत आहे. कळवण-नाशिकसह दिल्ली, गुरगाव, नोएडा, हरिद्वार, रूरकी, सहारणपूर, जयपूर, इंदोर, देवास, छिंदवाडा, नागपूर, नारगोळ, अंकलेश्वर, येवला या शहरांचा त्यात समावेश आहे. कळवण येथील विनाशुल्क कार्यक्रमाचा शहरासह सटाणा, देवळा, मालेगाव, पेठ, सुरगाणा तालुक्यातील सहजयोगी बंधू-भगिनींनी आनंद घेतला. (वार्ताहर)