‘भारत बचाव’ रथयात्रा उद्या सिन्नर शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:50 IST2018-04-01T23:50:00+5:302018-04-01T23:50:00+5:30
सिन्नर : लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान काढण्यात आलेल्या भारत बचाव महारथाचे उद्या सकाळी ८.३० वाजता सिन्नर शहरात आगमन होत आहे.

‘भारत बचाव’ रथयात्रा उद्या सिन्नर शहरात
सिन्नर : लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान काढण्यात आलेल्या भारत बचाव महारथाचे उद्या सकाळी ८.३० वाजता सिन्नर शहरात आगमन होत आहे. या यात्रा रथाचे आडवाफाटा येथे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर देवीमंदिर रोडवरील भगवती मंगल कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील सुरेश चव्हाणके यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा काढण्यात आली आहे. देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी चव्हाणके यांनी देशभर आंदोलन छेडले आहे. यावेळी महामंडालेश्वर शांतिगीरी महाराज, सेवानिवृत्त मेजर जनरल एस. पी. सिन्हा, परमवीरचक्र प्राप्त टी. पी. त्यागी हे उपस्थित राहणार आहे.