शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ३२६ ठिकाणी होणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:13 IST

नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली.

ठळक मुद्दे इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकची (आयपीपीबी) मुहूर्तमेढ रोवली. ३२६ ठिकाणाहून नागरिकांना या बॅँकिंग सुविधेचा नाशिक विभागात लाभ

अझहर शेख, नाशिक : टपालखात्याचा भारतीय बॅँक व्यवस्थेत पाया भक्कम करण्यासाठी व आधुनिक बॅँकिंग सुविधा टपालखात्यामार्फत ग्राहकांना पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नुकतीच इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकची (आयपीपीबी) मुहूर्तमेढ रोवली. आयपीपीबीचा विस्तार मुख्य टपाल कार्यालयअंतर्गत डिसेंबरअखेर होण्याची चिन्हे आहेत. उप टपाल कार्यालय, शाखा टपाल कार्यालये अशा ३२६ ठिकाणाहून नागरिकांना या बॅँकिंग सुविधेचा नाशिक विभागात लाभ घेता येणार आहे.

काळासोबत चालत टपाल खाते कात टाकू लागले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संदेशवहनाची ताकद वाढली आहे. त्यामुळे केवळ टपालांचा बटवडा यापुरतेच मर्यादित राहून चालणार नसल्याने केंद्र सरकारकडून टपालखात्याला विविध शासकिय योजना बॅँकिंग व्यवस्थेमधील टपालाचा प्रवेश, कोअर बॅँकिंगद्वारे टपाल कार्यालयांची जोडणी आणि आता ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’ अशा विविध नाविन्यपूर्र्ण प्रयोगांमधून टपाल खाते काळानुरूप बदलत आहे. नाशिकमधील मुख्य टपाल कार्यालयात स्वतंत्रपणे ‘आयपीपीबी’चे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली.--‘आयपीपीबी’चे मोबाईल अ‍ॅपइंटरनेट बॅँकिंगपासून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएसपर्यंत सर्व बॅँकिंग सुविधांसह ई-पे बिलींगचीही सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळविता येते. तसेच पोस्टपेड, प्रिपेड मोबाईल कनेक्शनचा रिचार्जदेखील या अ‍ॅप्लिकेशनद्वारे सहज करता येतो. यामुळे टपाल खात्याची बॅँकिंगव्यवस्था ‘स्मार्ट’ झाली आहे. खाते उघडण्यासाठी आरंभिक ठेव रक्कम शुन्य असून बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर तिमाही चार टक्के असा व्याजदर असल्याची माहिती ‘आयपीपीबी’नाशिकचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र आघाव यांनी दिली. खाते उघडल्यानंतर खातेधारकाला एक क्यू-आर कार्ड दिले जाते, हे कार्ड म्हणजे त्याचे पोस्ट बॅँकेचे स्मार्ट पासबूकच.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिकIndiaभारतBanking Sectorबँकिंग क्षेत्र