बसचालक पवार यांना इंडिया बस अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:36 IST2018-08-29T19:35:57+5:302018-08-29T19:36:12+5:30

सिन्नर : येथील राज्य परिवहन आगारातील चालक रामदास गणपत पवार यांना राष्टÑीय स्तरावरील इंडिया बस अवॉर्ड देण्यात आले.

India Bus Award for Basilak Pawar | बसचालक पवार यांना इंडिया बस अवॉर्ड

बसचालक पवार यांना इंडिया बस अवॉर्ड

सिन्नर : येथील राज्य परिवहन आगारातील चालक रामदास गणपत पवार यांना राष्टÑीय स्तरावरील इंडिया बस अवॉर्ड देण्यात आले.
सिन्नर आगारातील चालक रामदास पवार यांनी राज्य परिवहन महामंडळात ३३ वर्षे सेवा केली आहे. मे. अशोक लेलॅँड कंपनीकडून राष्टÑीय स्तरावर इंडिया बस अवॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पवार यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात पवार यांना इंडिया बस अवॉर्ड प्रदान करण्यात आले. मुंबई येथील वाहतूक खात्याच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पवार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाव्यवस्थापक देवल यांच्यासह कंपनीचे व राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

 

Web Title: India Bus Award for Basilak Pawar

टॅग्स :Governmentसरकार