सटाणा येथे स्वतंत्र सेनानी डॉ. भुतेकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 15:49 IST2020-12-27T15:47:59+5:302020-12-27T15:49:38+5:30
सटाणा : स्वातंत्र्य सेनानी डॉ. गंगाधर बाळकृष्ण भुतेकर यांच्या पूण्य तीथीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सटाणा येथे स्वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाधर भुतेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतांना दिनकर सोनवणे, सुरेखा बच्छाव समवेत महेश देवरे, दीपक नंदाळे, माणिक वानखेडे, ज्ञानेश्र्वर खैरनार, गोविंद वाघ आदींसह पालीकेचे कर्मचारी व ग्रामस्थ.
सटाणा : स्वातंत्र्य सेनानी डॉ. गंगाधर बाळकृष्ण भुतेकर यांच्या पूण्य तीथीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
येथील डॉ. भुतेकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास जेष्ठ नगरसेवक दिनकर सोनवणे, नगरसेवक सुरेखा बच्छाव, गटनेते महेश देवरे, नाभिक समाजाचे मार्गदर्शक गोविंद वाघ, दीपक नंदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. भुतेकर यांनी आपल्या प्रखरवाणीने ब्रिटीशांच्या काळात बागलाण सह चांदवड, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला परिसरातील जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करून स्वातंत्र्य लढयात सामील करून घेतले. तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात अनेक वेळा आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
तरूणपणातच स्वातंत्र्यल ढयात झोकून दिलेले डॉ. भुतेकर यांनी संपूर्ण आयुष्य ब्रम्हचारी राहून देशसेवा केली. मात्र आजही त्यांच्या समाधीची शासनाकडून दखल घेतली गेली नसल्याची खंत इतिहास संशोधक भगवान चित्ते यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. भुतेकर यांच्या स्मारकाचे अपूर्ण काम लवकर पूर्ण करून त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवावी या मागणीचे निवेदन नगरसेवक दिनकर सोनवणे यांना देण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य निरीक्षक माणिक वानखेडे, ज्ञानेश्र्वर खैरनार, किशोर सोनवणे, सुरेश सोनवणे, सचिन भदाणे, सुनिल निकम मंगला निकम, रंजना वाघ, मनिषा निकम, तृप्ती भदाणे, सुलोचना भदाणे, सिमा निकम, सविता भदाणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.