शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

अपक्ष कोकाटेंना सिन्नरमध्ये गोडसेंपेक्षा अधिक मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:18 AM

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी सुमारे तीन लाख मतांनी विजय मिळविला खरा परंतु त्यांना अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या होमपिचवर डोकेवर काढू दिले नाही.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी सुमारे तीन लाख मतांनी विजय मिळविला खरा परंतु त्यांना अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या होमपिचवर डोकेवर काढू दिले नाही. ९१ हजार मते मिळवणाऱ्या कोकाटे यांना विजय मिळाला नाही, परंतु विधानसभेची रंगीत तालीम मात्र त्यांनी करून घेतली.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून, त्यातच सिन्नरचा समावेश होतो. सिन्नर मतदारसंघ हे कोकाटे यांचे होमपिच होय. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी त्यांना गोडसे यांना मतांची आघाडी मिळवून देण्याचा दिलेला शब्द पाळता आला नाही. सिन्नर मतदारसंघात १ लाख ९४ हजार ३१६ इतके म्हणजेच एकूण मतदार संख्येच्या तुलनेत ६४.९७ टक्के मतदान झाले होते. त्यात सिन्नर मतदारसंघात अपक्ष असूनही माणिकराव कोकाटे यांना ९१ हजार ११४ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ५६ हजार ६७६ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार समीर भुजबळ यांना तर अवघी ३० हजार मते मिळाली. म्हणजेच गोडसे यांच्यापेक्षा ३४ हजार ३३६, तर भुजबळ यांच्यापेक्षा ६० हजार १७२ मते अधिक मते मिळाली आहेत.कोकाटे हे अपक्ष असतानादेखील त्यांनी १ लाख ३४ हजार २२९ मते मिळवली आहेत. अन्य मतदारसंघांमध्ये नाशिक पूर्वमध्ये ६६६६, नाशिक पश्चिममध्ये ६७१९, नाशिक मध्य मतदारसंघामध्ये ५९६४, देवळाली मतदारसंघात १०,०९६ आणि इगतपुरी मतदारसंघात १३ हजार ६७० मते मिळाली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक