शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्वातंत्र्यदिन शासकिय सोहळा : तीस हजार कुटुंबांना मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:25 IST

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी केला.

नाशिक : पंडीत जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथमस्थानी असून ग्रामिण भागातही विविध घरकूल योजनांच्याद्वारे २१ हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आगामी काळात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केलेनाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अकादमीच्या संचालक अस्वती दोरजे, पोलीस अधिक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण शिवार, उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदि माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. मागील दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी यावेळी केला. शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दिला गेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी मराठा समाजासाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचाही आढावा घेत, मेरी येथे विद्यार्थी वसतीगृहासाठी दोन इमारतींच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान, मुलींचा जन्मदर वाढीसाठी आरोग्य विभागाकडून कौतुकास्पद प्रयत्न झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वन मंत्रालयाकडून राबविलेल्या वनमहोत्सवांतर्गत राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचे अभियान वनविभाग व सर्व शासकिय, निमशासकिय सरकारी यंत्रणांसह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात सरकारला यश आल्याचे महाजन म्हणाले.दरम्यान, याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजन