शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:49 PM

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मीक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देनांदगाव येथील हुतात्मा चौकात नूतनीकरण

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मीक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सर्जेराव पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय मराठे, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. रविंद्र देवरे, प्रा.सुरेश नारायणे उपस्थित होते. प्रा.सागर कडलग यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पल्लवी गुढेकर, नैना पगारे, रूपाली भालेकर, दर्शना चोपडा, रितीका मोरे, संस्कृती तोरणे आदी उपस्थित होते.हुतात्मा चौक, नांदगाववीरमरण प्राप्त झालेल्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मारकाचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन आमदार सुहास कांदे, वीरपिता मारु ती ढोकरे, वीरपत्नी शीतल मल्हारी लहिरे, वीरपिता प्रल्हाद पगार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र धामणे यांच्या संकल्पनेतून शहरात हुतात्मा स्मारक उभारले होते; परंतु काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने स्मारक पडले होते. त्यामुळे स्मारकाची दुरु स्ती करण्याची मागणी तालुक्यातील विविध संघटनानी केली होती. आमदार सुहास कांदे यांनी स्वखर्चाने हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण केले. शहीद संजय मारु ती ढोकरे यांचे वडील मारु ती ढोकरे, शहीद शरद प्रल्हाद पगार यांचे वडील प्रल्हाद पगार, शहीद मल्हारी लहिरे यांच्या पत्नी शीतल लहिरे यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नांदगाव ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बापूसाहेब कवडे, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, नगराध्यक्ष राजेश कवडे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, विलास आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख सुनील जाधव, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुमित सोनवणे, सुमित गुप्ता आदी उपस्थित होते.आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, न्यायडोंगरीस्व. गंगाधर शिवराम आहेर अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आश्रमशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल मुख्याध्यापक पी. बी. गावित यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक व वुमन्स अ‍ॅण्ड चाईल्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट आयोजित व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणांतर्गत ब्यूटिपार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा सुनीता आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय प्रांगणात पंडित साळुंखे, पप्पूशेठ नहार, सदाशिव सरगर, ताराचंद मोरे, चांगदेव चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माजी आमदार अनिल आहेर यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनnandgaon-acनांदगाव