मालेगावसह परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:09+5:302021-08-17T04:20:09+5:30
आदर्श इंग्लिश मीडियम मालेगाव : शहरातील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुधाकर निकम यांच्या ...

मालेगावसह परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
आदर्श इंग्लिश मीडियम
मालेगाव : शहरातील मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुधाकर निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य एन. डी. बच्छाव, स्वाती देवरे व शिक्षक उपस्थित होते.
विनय मंदिर प्राथमिक शाळा
येथील विनय मंदिर प्राथमिक शाळेत अध्यक्षस्थानी माजी सैनिक जिभाऊ अहिरे होते. त्यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका पौर्णिमा खरे, अमित खरे उपस्थित होते, मुख्याध्यापक धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशांत ठाकरे यांनी आभार मानले.
अजिंठा मंडळ प्राथमिक शाळा
मालेगाव : संगमेश्वरातील अजिंठा मंडळ प्राथमिक शाळेत तुलसीदास बैरागी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत लिंगायत, सखाराम घोडके, राजेंद्र लोहारकर, अरुण गोंधळे आदी उपस्थित होते.
सरस्वती विद्यालय सायने
मालेगाव : सायने येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी एस. टी. अहिरे होते. अशोक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरसेवक नंदकुमार सावंत, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य काळू सावंत, देवीदास सावंत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जागृती विद्यालय
मालेगाव : शहरातील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित कै. त्र्यं. दो. शिरुडे प्राथमिक विद्यामंदिर व जागृती माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष विजय पोफळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
साने गुरुजी शाळा
मालेगाव : शहरातील श्रीरामनगर भागातील साने गुरुजी प्राथमिक शाळेत दीपक शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक खंबाईत व शिक्षक उपस्थित होते.