इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:09 IST2017-09-10T00:08:43+5:302017-09-10T00:09:06+5:30
बर्मा (म्यानमार) सैन्य दलातर्फे तेथील रोहिंग्या मुस्लीम समाजातील नागरिकांसह महिला व लहान मुलांवर अत्याचार करीत त्यांच्या हत्या करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या वतीने आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी ३ वाजता किदवाई रोडवरील शहीदोंकी यादगार येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

इन्सानियत बचाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
आझादनगर : बर्मा (म्यानमार) सैन्य दलातर्फे तेथील रोहिंग्या मुस्लीम समाजातील नागरिकांसह महिला व लहान मुलांवर अत्याचार करीत त्यांच्या हत्या करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या वतीने आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी ३ वाजता किदवाई रोडवरील शहीदोंकी यादगार येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले. प्रांताधिकारी अजय मोरे यांनी आंदोलकाच्या वतीने मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी आमदार शेख म्हणाले की, म्यानमारमध्ये होणारे हल्ल्यांमुळे तेथील मुस्लीम भयभीत झाले आहेत.
यावेळी मौलाना फिरोज आझमी, मौलाना अनिस अजहर, शफीक राणा, माजी नगरसेवक एजाज उमर यांची भाषणे झाली.