इंदिरानगर परिसरात गणेश मंडळाच्या बैठका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:02 IST2017-07-29T23:58:45+5:302017-07-30T00:02:13+5:30

indairaanagara-paraisaraata-ganaesa-mandalaacayaa-baaithakaa-saurauu | इंदिरानगर परिसरात गणेश मंडळाच्या बैठका सुरू

इंदिरानगर परिसरात गणेश मंडळाच्या बैठका सुरू

ठळक मुद्दे गणेशोत्सव मंडळाच्या बैठका सुरूतयारीचे नियोजन वर्गणीसाठी चांगलीच पायपीट वर्गणीच्या अंदाजानुसार मंडळांनी देखावा

इंदिरानगर : परिसरात गणेशोत्सव मंडळाच्या बैठका सुरू झाल्या असून, तयारीचे नियोजन करण्यात येत आहे. यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागणार आहे. कारण गत वर्षी मनपा निवडणुकीमुळे वर्णणीसाठी कुठे जाण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळे गणेशोत्सव भव्यदिव्य साजरा करण्यात आला होता. यंदा तसे काही नसल्याने वर्गणी गोळा करून त्यानुसार गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. वर्गणीच्या अंदाजानुसार मंडळांनी देखावा, विद्युत रोषणाई आणि वाद्यवृंदाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. कारण अवघ्या एक महिनावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. वेळेवर मंडप मिळण्यास कोणताही प्रकारचा त्रास होऊ नऊ म्हणून मंडप आगाऊ पैसे देऊन बुक करण्यात येत आहे. तसेच श्रीची आकर्षक मूर्ती बघण्यासाठी मुंबई आणि नाशिक येथील मूर्तिकाराकडे जाऊन त्याचीही बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मंडळाच्या बैठका होऊन नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन प्रत्येकास काही तरी जबाबदारी देण्यात येत आहे. भाजपाप्रणात युनिक ग्रुप, भाजपाप्रणित अजय मित्रमंडळ, नवदुर्गा मित्रमंडळ, विनयनगर मित्रमंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळसह परिसरातील मंडळाच्या बैठका घेऊन गणेशोत्सवाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

Web Title: indairaanagara-paraisaraata-ganaesa-mandalaacayaa-baaithakaa-saurauu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.