शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच दिवसांत वाढतो जंतुसंसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:45 IST

प्रौढ झाल्यापासून प्रत्येक मुलीला सुरू होणारी मासिकपाळी वयाच्या पन्नाशीपर्यंत चालते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.

मासिक पाळी स्वच्छता दिननाशिक : प्रौढ झाल्यापासून प्रत्येक मुलीला सुरू होणारी मासिकपाळी वयाच्या पन्नाशीपर्यंत चालते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. शहरी भागात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे या दिवसांमध्ये बहुतांश महिलांकडून वैयक्तिक स्वच्छतेकडे कानाडोळा केला जातो. परिणामी अलीकडे जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.प्रत्येक महिलेचा मासिकपाळीशी संबंध येणे हे जरी नैसर्गिक असले तरी समाजात त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृतीवर भर दिला जात आहे. शाळा, महाविद्यालयांमधून अभियान राबविले जात आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील मुली-महिलांमध्ये मासिकपाळीविषयीची जागृती वाढीस लागताना दिसते. असे असले तरी मासिकपाळीत घ्यावयाची खबरदारी आणि वैयक्तिक स्वच्छतेविषयी कळत नकळत दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होताना दिसतो. वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन त्याचा आघात गर्भाशयावरही होतो, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार यांनी सांगितले.त्या चार ते पाच दिवसांत स्वच्छतेविषयी खबरदारी न घेतल्यास जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयाला सूज येऊन ओटीपोटात दुखावा अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेविषयी महिलांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. शहरी, ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थिनी अनेकदा इच्छा व गरज असूनही त्या दिवसांत वैयक्तिक स्वच्छतेसाठी जाणे टाळतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन प्रशासनाने मुलींच्या स्वच्छतागृहांच्या अवस्थेविषयी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.चार तासांत  ‘सॅनेटरी’ बदलावेमासिक पाळीदरम्यान रक्तस्त्रावचे प्रमाण कमी असो किंवा अधिक महिला, तरुणींनी सॅनेटरी नॅपकिन चार तासांपेक्षा अधिक वेळ न ठेवता बदलणे गरजेचे आहे. कारण रक्तामध्ये जंतूंची वाढ झपाट्याने होत असते, त्यामुळे आजार होऊ शकतात असे डॉक्टरांनी सांगितले.ओटी पोटात दुखणे, पुरळ येणे, रॅशेस येणे, वंध्यत्व येणे असे प्रकार यापूर्वीच्या काळात होत नव्हते; मात्र अलीकडे सॅनिटरी नॅपकीनचा वापर होऊनही या समस्या उद्भवतात. रक्तात जंतूंची निर्मिती अधिक होते. भुलथापा देणाऱ्या जाहिरातींना महिला बळी पडतात आणि महिला, मुली पॅड तीन तासांपेक्षा अधिक वेळ वापरून जंतुसंसर्गाला निमंत्रण देतात. केमिकल्सचा अधिकाधिक वापर पॅडमध्ये काही कंपन्यांकडून केला जाऊ लागल्याने जंतुसंसर्गाचा धोका उद्भवतो. सुती कापड वापरत असाल तर तेदेखील स्वच्छ धुऊन सूर्यप्रकाशत वाळविण्यास प्राधान्य द्यावे. याबाबत आमच्या मंडळाकडून जनजागृती क रण्यावर भर दिला जात आहे.- रसिका जानराव, सामाजिक कार्यकर्त्यासॅनिटरी नॅपकीनचा वापर आवश्यक आहे. नॅपकिन्स जास्त वेळ ठेवल्यास पुरळ उठणे, रॅशेस येणे, अशा समस्या होऊन जंतुसंसर्ग होऊ शकतो. यादरम्यान दररोज आंघोळ, वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची आहे. याबाबत काटकसर, कंटाळा करता कामा नये. मनपा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था आहे. मुबलक पाण्यापासून सर्वच सोयी-सुविधांची वानवा दिसून येते.- डॉ. माधवी मुठाळ, स्त्री-रोग तज्ज्ञमासिकपाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छतेविषयी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच चांगला आहारदेखील असणे आवश्यक आहे. अलीकडे जास्त केमिकलचा मारा असलेले सॅनेटरी नॅपकिन बाजारात मिळतात त्यापासून अ‍ॅलर्जीचा धोका बहुतांश मुलींना स्त्रियांना होतो. जंतुसंसर्गामुळे गर्भनलिके लाही धोका निर्माण होऊन पुढे वंध्यत्वाची शक्यता बळावते.- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यWomenमहिला