सिडकोत डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:11 IST2017-10-27T23:49:37+5:302017-10-28T00:11:25+5:30
दीपावली सणानंतर सिडको भागात ठिकठिकाणी घाण व कचºयाचे ढीग साचले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे सिडको भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. यातच मनपाच्या पेस्ट कंट्रोल विभागावर कोणाचाही धाक नसल्याने या विभागाचे कामकाज मनमानी सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सिडकोत डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ
सिडको : दीपावली सणानंतर सिडको भागात ठिकठिकाणी घाण व कचºयाचे ढीग साचले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे सिडको भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. यातच मनपाच्या पेस्ट कंट्रोल विभागावर कोणाचाही धाक नसल्याने या विभागाचे कामकाज मनमानी सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याबाबत आज महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या सिडको विभागाच्या वतीने मनपा विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. सिडको विभागात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झाली असून, मनपाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत आज महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय अध्यक्ष रामदास दातीर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यात सिडको विभागात सहा प्रभाग येत असून, या भागात दिवाळी सण झाल्यानंतर ठिकठिकाणी घाण व कचºयाचे ढीग झालेले दिसून येत असून, हा कचरा उचलण्यात मनपा सपशेल अपयशी ठरली असून, यामुळे सिडको भागात साथीचे रोग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. यातच डासांचे प्रमाणही वाढले असताना संबंधित विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या डेंग्यूच्या आजारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मनपाने याबाबत उपाययोजना करावी अन्यथा मनपाच्या विरोधात खळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मनसे सिडको विभाग अध्यक्ष रामदास दातीर, अॅड. अतुल सानप, नितीन माळी, अॅड. सागर कडभाने, अरुण वेताळ, अरुण दातीर, संदेश जगताप, संदीप दोंदे, विजय आगळे, नंदलाल मिस्तरी, हेमंत अहिरे, कैलास मोरे आदी उपस्थित होते.